औरंगाबाद : शहरातील कलश मंगल कार्यालय येथे परशुराम सेवा संघ संभाजीनगर आयोजित वधु-वर संमेलन मोठ्या प्रतिसादात पार पडले.या संमेलना अंतर्गत मागील संमेलनात नोंदणी केलेल्या कल्याणी पाटील (B.E.E&TC) व यश क्षिरसागर (HM व स्वत:चा हॉटेल व्यावसाय) यांचा विवाह मागिल संमेलनात जुळल्या बद्दल त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक परशुराम सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उल्हास अकोलकर यांनी केले.तसेच परशुराम सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मुळे यांनी विवाह समस्या व पालकांची भूमिका यावर विचार मांङले. परशुराम सेवा संघ सदैव प्रत्येक अङचणीत समाजबांधवां सोबत आहे व राहिलही अशी ग्वाही दिली.
संमेलनाचा द्वितीय सत्रात प्रसिध्द प्राध्यापक सदाशिव देशमुख यांनी वधुस ब्राह्मणच वर का?? या विषयावर अतिशय समर्पक शब्दांत मार्गदर्शन केले. तृतीय सत्रात विजया अवस्थी यांनी विवाह संस्काराचे महत्व या विषयावर रोखठोक शब्दांत आपले विचार मांडले.संमेलनाच्या चतुर्थ सत्रात नोंदणीकृत वधू वरांचा प्रत्यक्ष परिचय करून देण्यात आला व वधू-वर पुस्तिकेचे विमोचन देखील करण्यात आले. या संमेलनात परशुराम सेवा संघाच्या पल्लवी नव्हाडे यांना शहर महिला संघटक पदाची जबाबदारी देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला शहराध्यक्षा शिल्पा गोखले यांनी केले तर आभार प्रदर्शन मराठवाडा उपाध्यक्ष प्रयागदास देशमुख यांनी केले.
हे संमेलन यशस्वी करण्याकरिता वधू-वर विभाग शहराध्यक्ष अनिल निरखी, युवा प्रदेश संघटक केदार पाटील, मराठवाडा महिला उपाध्यक्षा अंजुषा कुलकर्णी, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष मोरेश्वर सदावर्ते, शहराध्यक्ष सागर खेर्ङेकर, शहर कार्याध्यक्ष महेश कुलकर्णी, कोषाध्यक्ष वसंत किनगांवकर, शहर उपाध्यक्ष रामचंद्र अंधारकर, श्री.सुधाकर तुंगार, श्री.श्रीहरी चौधरी, श्री.दिगंबर पाठक,शहर उप-प्रसिद्धीप्रमुख श्री.विकास गोरवाङकर, श्री.प्रशांत मोहळे, श्री अशोक कुलकर्णी, मराठवाडा युवा संघटक श्री ऋषिकेश सराफ, युवा शहराध्यक्ष अभिषेक इंदापूरकर, युवा शहर उपाध्यक्ष श्री.शुभम गालफाडे , श्री.मंथन पुराणिक,महिला शहर कार्याध्यक्षा सौ.जयश्री अकोलकर,महिला शहर उपाध्यक्षा सौ.माधुरी बर्दापूरकर, सौ.सुप्रिया जोशी सौ.स्नेहल खेर्ङेकर सौ.शिल्पा देशपांडे, व सर्व पदाधिकारी परशुराम सेवा संघ संभाजीनगर यांनी अथक परिश्रम घेतले.